...अन तिचे पोलीस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे..!

Foto
औरंगाबाद- पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या एका १८ वर्षीय तरुणीचा प्रशिक्षणच्या पहिल्याच दिवशी मैदानात सराव करीत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाळूज पंढरपुरात आज सकाळी घडली. 
सीमा भगवान बोकनकर वय-१८ (रा. पंढरपूर) असे मृत्यू पावलेल्या  तरुणीचे नाव आहे.

मृत सीमाच्या घरची परिस्थिती अत्यंत  हलाखीची आहे. वडील आजाराने ग्रासलेले आहे तर आई मिळेल ते काम करून घर चालवते.  नवरा दोन मुली एक मुलगा अशा पाच जणांच्या परिवाराचा गाडा हाकत आहे. सीमाला पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने पंढरपूर परिसरतीलच रेस लक्ष्य करिअर अकॅडमीत ओळखीच्या मदतीने कालच जाऊन सीमाचा प्रवेशाचा अर्ज भरला होता. व पैशे हळू हळू भरू असे सांगितले होते. एका गरीब कुटुंबातील मुलगी प्रशिक्षण घेण्यासाठी आल्याने अकॅडमी प्रशासनाने  देखील पैशाचा विचार न करता तिला प्रवेश दिला.तिचा आज पहिला दिवस असल्याने  आई स्वतः सकाळी ६ वाजता सिमाला सोडण्यासाठी मैदानात गेली होती. प्रक्षिशनही सुरू झाले मात्र काही मिनिटातच सीमाला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो पर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन नंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker